संयुक्त कर्ज

संयुक्त कर्ज

जमीन विकत घेणे आणि स्वतःसाठी घर बांधणे हा तुमच्यासाठी सर्वात मोठा, धाडसी आणि कठीण निर्णय असू शकतो. आमच्या संयुक्त कर्जाद्वारे तुम्ही तुमच्या आवडीची जमीन शोधू करू शकता आणि तुमचे स्वप्नातील घर बांधू शकता.

  • जमीन खरेदी करण्यसाठी आणि त्यानंतर घर बांधण्यासाठी कर्ज.
  • कार्यक्षम कायदेशीर आणि तांत्रिक आधार.
  • दीर्घकालीन आणि जास्तीत जास्त कालावधी

1. कर्जाची मुदत

कमाल 30 वर्षे
*हे तुमच्या निवृत्तीच्या वयाच्या वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. (पगारदार व्यक्तींसाठी 60 वर्षे आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी 70 वर्षे)

 

2. कर्जाची रक्कम

मालमत्तेच्या नोंदणीकृत मूल्याच्या ६०%, जमीन खरेदीसाठी प्रारंभिक कर्ज म्हणूनदेण्यात येईल आणि बांधकाम खर्चाच्या अंदाजानुसार उर्वरित रक्कम

3. व्याज दर आणि शुल्क

तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर CIBIL स्कोअरशी जोडलेला आहे (नियम आणि अटी लागू)

सर्वोत्तम दर जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

परिवर्तनीय दर

 

4. परतफेडीची पद्धत

तुम्ही तुमचे गृहकर्ज ईएमआय याद्वारे भरू शकता:

  • इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ECS)/ नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH)- तुमच्या बँकेला दिलेल्या मानक सूचनांवर आधारित
  • पोस्ट डेटेड चेक (PDCs) – तुमच्या पगार/बचत खात्यावर काढलेले. (केवळ ज्या ठिकाणी ECS/NACH सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी)

 

5. विमा

  • मोफत मालमत्ता विमा.
  • मोफत अपघाती मृत्यू विमा
  • कोटक लाइफ इन्शुरन्स, बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स द्वारे जीवन विमा ( एकवेळच्या प्रीमियम विरुद्ध पर्याय) व्यवस्था.

ईएमआय परीगणक:

गृह कर्ज ईएमआय परीगणक हा एक मूलभूत परीगणक आहे जो तुम्हाला मूळ रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दराच्या आधारावर ईएमआय, मासिक व्याज आणि मासिक कमीत कमी बॅलन्स ठेवण्यास मदत करतो.

कृपया लक्षात घ्या की गृह कर्ज ईएमआय परीगणक तुम्हाला अंदाजे रक्कम किती असेल हे सांगण्यासाठी तयार केले गेले आहे आणि ते पूर्णपणे बरोबर मानले जाऊ नये.

पात्रता परीगणक:

गृहकर्ज पात्रता परीगणक (Calculator) मार्गदर्शक म्हणून काम करते. हे तुम्हाला तुमच्या गृहकर्जासाठी अंदाजे किती रक्कम मिळू शकेल हे सांगते.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्ता पुरावा (कोणताही आवश्यक

  • पॅन कार्ड (अनिवार्य, कर्ज पात्रता गणनेसाठी उत्पन्नाचा विचार केल्यास)
  • वैध पासपोर्ट
  • मतदार ओळखपत्र
  • चालक परवाना
  • आधार कार्ड (अनिवार्य)

रहिवासी पुरावा (कोणताही आवश्यक)

  • युटिलिटी बिल: वीज, टेलिफोन, पोस्टपेड मोबाईल, पाणी बिल इ.
  • शिधापत्रिका
  • मालकाकडून पत्र
  • बँक स्टेटमेंट/पास बुकची प्रत ज्यावर पत्ता लिहिलेला असेल
  • वैध भाडे करारपत्र
  • विक्री करार

उत्पन्नाची कागदपत्रे

पगारदार व्यक्ती

  • मागील १२ महिन्यांच्या पगाराच्या स्लिप किंवा पगार प्रमाणपत्र*
  • मागील १ वर्षाच्या बँक स्टेटमेंटची प्रत (पगार खाते)
  • फॉर्म १६ / ट्रेसेस *जर ओव्हरटाईम आणि इन्सेंटिव्ह सारखे परिवर्तनशील घटक आढळून आले तर, मागील सहा महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स आवश्यक आहेत.

स्वयंरोजगार व्यावसायिक

  • व्यावसायिकांसाठी पात्रता प्रमाणपत्र : सी.ए, डॉक्टर किंवा आर्किटेक्ट
  • मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या गणनेसह
  • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे.
  • व्हॅट किंवा सेवा कर रिटर्न किंवा जीएसटी किंवा टीडीएस प्रमाणपत्र
  • मागील १२ महिन्यांचे बँक स्टेटमेंट (बचत खाते, चालू खाते आणि O/D खाते)

बिझनेस क्लास

  • तुमच्या मागील तीन वर्षांच्या आयकर रिटर्नची प्रत, उत्पन्नाच्या गणनेसह
  • मागील तीन वर्षांच्या पी/एल खात्याची प्रत, परिशिष्ट आणि ऑडीट केलेल्या बॅलन्सशीटसह जेथे लागू असेल तेथे.
  • व्हॅट किंवा सेवा कर रिटर्न किंवा जीएसटी किंवा टीडीएस प्रमाणपत्र
  • गेल्या एक वर्षाचे बँक स्टेटमेंट. (बचत खाते, चालू खाते किंवा O/D खाते)

मालमत्तेची कागदपत्रे

  • बिल्डरकडून वाटप पत्र.
  • विक्रीचा करार.
  • नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची पावती.
  • निर्देशांक- ii.
  • बिल्डरकडून एनओसी.
  • स्वत:च्या योगदानाची पावती ( ओसीआर )
  • सर्व बिल्डर लिंक्ड दस्तऐवज (जीआयसीएचएफएल द्वारे मंजूर नसलेल्या किंवा पूर्वी निधी न मिळालेल्या प्रकरणांसाठी लागू).
  • विकास करार.
  • भागीदारी करार.
  • विक्री करार.
  • टायटल सर्च रिपोर्ट .
  • बांधकामासाठी अंदाज.

टीप: मूळ दस्तऐवज केवळ पडताळणीच्या उद्देशाने आवश्यक आहेत ( आम्ही तुम्हाला विनंती करतो की, केवायसी वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.)